Kosha

Kosha

by Date Panchang

To see our Services visit our website

2 ऑक्टोबर 2023 - संकष्ट चतुर्थी

Chaturthi June Wide
प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. या व्रताची देवता गणेश असून या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो व रात्री चंद्रोदया नंतर गणेशाची पूजा करून उपवास सोडला जातो. या व्रताकरिता चतुर्थी तिथी चंद्रोदय व्यापिनी असणे आवश्यक असते. भारतात सर्वत्र संकष्ट चतुर्थीचे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाते. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता आहे या व्रताने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे संकष्ट चतुर्थी व्रताचे महात्म्य सांगितले जाते.
नुकतीच श्रीगणेशोत्सवाची सांगता झाली. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील म्हणजेच महालय पक्षातील ही चतुर्थी. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सूर्योदयाला तृतीया तिथी असून सकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी तृतीया तिथी संपते व चतुर्थी तिथी सुरु होत आहे. याच दिवशी संकष्ट चतुर्थी बरोबर महालयातील भरणी श्राद्ध व चतुर्थी श्राद्ध आहे.
2 ऑक्टोबर 2023, मुंबई चंद्रोदय रात्री ८.३८ (२०.३८) आहे. इतर काही प्रमुख गावांचे चतुर्थी चंद्रोदय खाली दिले आहेत.
अकोला२०:१८गोकर्ण२०:४०पाली२०:३८रत्नागिरी२०:४०
अमरावती२०:१४ग्वाल्हेर२०:०३पुणे२०:३५रांजणगांव२०:३३
अलिबाग२०:३९जबलपूर२०:०१पुळे२०:४०लातूर२०:२४
अहमदनगर२०:३०जळगांव२०:२३बीड२०:२६वडोदरा२०:३१
अहमदाबाद२०:३२जालना२०:२४बीदर२०:२१वर्धा२०:११
इंदूर२०:१९ठाणे२०:३७बुलढाणा२०:२२विजयपूर२०:३०
धाराशिव२०:२७धारवाड२०:३५बेंगळूरु२०:२९वेंगुर्ले२०:४०
ओझर२०:३१धुळे२०:२७बेळगांवी२०:३७सांगली२०:३५
छ.संभाजीनगर२०:२६नांदेड२०:१९भंडारा२०:०६सातारा२०:३६
कलबुर्गि२०:२५नागपूर२०:०८भुसावळ२०:२३सावंतवाडी२०:४०
कल्याण२०:३६नाशिक२०:३३भोपाळ२०:१२सिद्धटेक२०:३१
कारवार२०:४०पंढरपूर२०:३०महड२०:३७सोलापूर२०:२८
कोल्हापूर२०:३७पणजी२०:४०मोरगाव२०:३३हुब्बळ्ळी२०:३५
गदग२०:३३परभणी२०:२२यवतमाळ२०:१४हैदराबाद२०:१८